Tuesday, 27 December 2011

हितगुज

१९ आणि २० तारखेला आश्रम शाळेत मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने कर्जतला जाण झाल.
कर्जत पासून दूर आंबिवली या ठिकाणी तीन आश्रम शाळांना आणि एका आदिवासी पाड्याला भेट दिली.
आश्रमशाळा आणि शाळा....... प्रचंड फरक आहे.आपण धावत पळत,आईने दिलेला डबा घेऊन,मित्र मैत्रीणीना हाक मारत शाळेत जायचो,आश्रम शाळेत  केवळ शिक्षणाच्या प्रबळ इच्छेपोटी घरापासून दूर राहणारी,भवतालच्या डोंगर दरयांची चित्र काढणारी,त्यावर कविता रचणारी मुलं पाहिली.'दहावी पास होणे' हेच त्यांच्यासाठी उच्च ध्येय आणि ज्यांना दोन वेळ पोटभर जेवायला मिळत ते सुखी कुटुंब! सातवी-आठवी पास/नापास  मुलींची लग्न यात कुणालाच काही नाविन्य वाटत नाही.
    अशावेळी आपल्या सुखांच्या कल्पनान्सोबत नकळत त्या स्वप्नांची तुलना होते.मोठमोठ्या लाकडाच्या मोळ्या (वजन साधारण नव्वद ते शंभर किलो) उचलणाऱ्या निरागस पऱ्या पाहून 'पा.... च किलो दळण?मला नाही जमणार आणायला' या स्वत:च्या वक्तव्याची उगाचच आठवण येते.इतक्यात कोणीतरी 'आता गावात रिक्षा आली ना..... सोय झाली पाच किलोमीटर वर! नाही तर आधी दहा किलोमीटर चालावं लागायचं.' अस म्हणत .... आता मला वेगळेच प्रश्न पडू लागतात....
खरंच आपण स्वतंत्र होऊन साठहून अधिक वर्ष उलटली?मग रस्ता आणि वीज या दोनच गोष्टी आदिवासींच्या पदरात? आणि त्यात ते धन्यताही मानतात!मग काही दशकांनी दुर्दैवाने आपण पारतंत्र्यात गेलो तर त्यांना खरंच फरक पडेल?
     प्राचीन काळी भारतात विविध समाज आणि प्रांत होते.तिथल्या तिथल्या राजे रजवाड्यांना केवळ स्वत:च्या राज्याची चिंता असायची.बाजूच्या राज्याशी काही घेण देण नाही... असलच तर वैर!  याचा पुरेपूर फायदा परकीयांनी उठवला!
पण पेटून उठतानाही सबंध देश एक व्ह्यायला खूप वेळ लागला.आपल्याच देश बांधवांबद्दल 'मला काय त्याच?'ही भावना होती. किसको दूसरों की पडी हैं? म्हणतात ना त्यापैकी! म्हणूनच स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झगडताना काही जणांनी संसार फुंकून टाकले तर काहींनी ब्रिटीशांच्या हाताखाली राबत 'फायर' च्या तालावर स्वत:च्याच बांधवाना मारण्यात धन्यता मानली! अखेर...लुटण्यासारख काही राहिलं नाही.... आपल्याला देशाला फाडून,पुरेशी हिंसा आणि धार्मिक द्वेष  पसरवून साहेब परत फिरला.
 पण.......
 देश पारतंत्र्यात होता आणि देश स्वतंत्र झाला या दोन्ही परिस्थितींचा तेव्हाही पुं.लं.च्या 'अंतू बर्वा' ला काही फरक पडला नाही.
कारण त्याला दोन्ही वेळा दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होतीच! साहेब होता तेव्हाही आणि साहेब गेला तेव्हाही! मग आज इतक्या वर्षांनंतर परिस्थिती वेगळी आहे का?
   राजे राजवाड्यांची जागा घोटाळा किंग्सनी घेतली आहे.अजूनही देशाचे सीमाप्रश्न अनुत्तरीत आहेत.महानगरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.सामान्य माणूस जगण्यासाठीच इतका संघर्ष करतो....शिक्षण,नोकरी,महागाई.... यात त्याला सामाजिक प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळच नाही.मग वंचित घटकांकडे कोण पाहणार? काही स्वयंसेवी संस्था आणि खरंच विकासाची तळमळ असणारे अधिकारी यांच्या आधारावर त्यांची प्रगती मूळ धरत आहे.ही परिस्थिती बदलेल?

5 comments:

 1. khupch chan... wish to join your work...!

  ReplyDelete
 2. पण आपण हे ही लक्षात घेतले पाहिजे की आताचा जो भारत आहे तो ब्रितिश्मुलेच आहे, कारन तय अधि तो तुकड्या मधे होता अणि स्वातंत्र्य नंतर ही तो एकत्र करतां आपल्याला अवघड गेले जसे हैदराबाद प्रान्त भारत मधे नंतर शामिल झाला. आणि एवढे वेगले असून देखिल आता भारत हा जगातील सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहे, आणि असे ६० वर्षे आपण एकत्र आहोत.... आता सगलेच बदल एकदम होणार नाहीत पण जे बदल घडत आहेत त्याला आपण पुढे होऊं positively घेतले पाहिजे... जिथे एके कलि रस्ते आणि विज नव्हती तिथे आता तय सोई होऊ लागल्या आहेत हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे.

  ReplyDelete
 3. ब्रीटीशांमुळे रेल्वे आणि पोस्टासारख्या अनेक सुधारणा झाल्या हे मान्य.
  पण आज आपलेच लोक तळागाळात सुधारणा पोहोचविण्यात कार्यक्षम ठरत नाहीत तेव्हा वाईट वाटत.आणि दुर्गम भागातल्या काही मुला मुलींच्या डोळ्यातली मोठी स्वप्नआणि त्यांना मिळणारी सरकारची आणि स्वयंसेवी संस्थांची बाजू ही नक्कीच सकारात्मक बाजू आहे.

  ReplyDelete
 4. pallyacha evhadha motha reply?????

  ReplyDelete