Tuesday 27 March 2012

उद्याचे बोक्या सातबंडे


उद्याचे बोक्या सातबंडे 
 प्रभावळकरांचा 'बोक्या सातबंडे'चा संच  बऱ्याच वर्षांनी हातात पाडला.आपण मोठे झालो तरी लहानपणी रम्य वाटणाऱ्या बोक्याच्या गमती पुन्हा वाचायला तितकीच मजा येते.बोक्याचा  चुणचुणीतपणा आणि तो शेंडेफळ असल्याने त्याचे होणारे लाड,मोठ्या भावाच त्याच्यावर डाफरण,बोक्यालाही धाक वाटणारे त्याचे बाबा, प्रेमळ आई आणि 'चिन्मायानंदा' या खऱ्या नावाने  हाक मारणारी एकमेव व्यक्ती म्हणजे त्याची आजी. या सर्वांच अगदी चपखल आणि या व्यक्तिरेखा खऱ्या वाटाव्यात अस चित्रण प्रभावळकरांनी केल आहे.बोक्याच्या अनेक उचापतींपैकी एक म्हणजे तो कामवाल्या मावशींच्या मुलांबद्दल त्यांच्याच तोंडून तक्रारी ऐकतो, 'माझी पोरं उगा दरदिवशी काहीबाही मागत रहात्यात 'ही कामवाल्या मावशींची तक्रार त्याला अजिबात अनैसर्गिक वाटत नाही, उलट रास्तच वाटते'. त्या मुलानाही आपल्या प्रमाणे सुटीत मजा का करता येऊ नये?' असा भाबडा प्रश्न त्याला पडतो.पण प्रश्नच उत्तर शोधणार नाही तो बोक्या कसला?उन्हाळाच्या सुटीत बोक्या आणि त्याचे मित्र मैत्रिणी आजूबाजूच्या गरीब मुलांना,कॉलनीत येणाऱ्या सगळ्या कामवाल्या मावशींच्या मुलामुलींना एकत्र करतात.आपल्याच वयाच्या या १५-२० मुलांना बोक्या आणि त्याचा ग्रुप मिळून गाणी,गोष्टी शिकवतात.चित्र काढायला मदत करतात.नेहरू तारांगणला नेऊन आणतात. यातूनच गोष्ट पुढे फुलवत बोक्याचा सत्कार आणि या सामाजिक कार्याबद्दल परदेशातील शिष्यवृत्ती आणि त्या निमित्ताने युरोपची वारी अशी छान खुलवली आहे.
   मित्रानो,यात अशक्य अस काहीच नाही. निदान एखाद्या मुलाच्या मनात या मदतीच्या भावना येण आणि त्याने त्या दृष्टीने प्रयत्न कारण अवघड नक्कीच नाही.पण हे आजूबाजूला दिसतंय का?? उत्तरादाखल नकारार्थी  मान हलली असेल तुमची.आपल्या कॉलनीतले ,सोसायटीतले 'बोक्या' कुठे हरवलेत? '९०च्या  दशकातली मुलं निव्वळ कॉम्पुटर,मोबाईलला चिकटूनअसतात' अशी ओरड आजकाल आपण सतत करतो. अगदी फेसबुक वरून सुद्धा! पण ही मुलं आपल्या आसपास सुद्धा आहेत......जर त्यांनी लहानपणापासून घरात कामवाल्या मावशीनं 'बाई' हाक मारलेली ऐकली तर त्यांना कसा काय जिव्हाळा वाटेल त्या व्यक्तीबद्दल? हजारो रुपयांची विशिष्ट जातीची कुत्री,मांजर तोरा मिळवण्यासाठी पाळायची पण रस्त्यावरच्या प्राण्यांना काही खायला घालायचं नाही.नाहीतर पाठीत धपाटा बसतो. लहान वयातच या आणि अशा अनेक गोष्टी या मुलांच्या मनावर कोरल्या जातात.त्यामुळे काही मोजके अपवाद सोडता आताची लहान मुलं बरीच आत्मकेंद्रित दिसतात.त्यांच्यातून केवळ पैसे छापणारे पदवीधर उदयाला येणार आहेत का?आणि हे असच राहील तर उद्याचे ग्रेस,पुं.ल.,शिरीष कणेकर,सुरेश भट ........नव्हे उद्याचे बोक्या हवे असतील आपल्याला तर आपल्या पिढीची जबाबदारी काय आहे? 


2 comments:

  1. बोक्याला........ग्रेस,पुं.ल.,शिरीष कणेकर,सुरेश भट....इत्यादी प्रतिष्टान मध्ये फक्त तूच बसू जाने.....तुझ्या प्रश्नच उत्तर एकाच ....त्यासाटी आपल्याला दिलीप प्रभावळकर व्हाव लागेल.... तसा विचार व तस पालकत्व अंगी बनवावं लागेल....

    ReplyDelete
    Replies
    1. एक तर असे किती पालक आहेत जे स्वताहून मुला बरोबर रोज बाहेर खेळतात आणि आपलेच उदहरण घ्याचे झाले तर आपण आपल्या लहान भाऊ बहिणीशी किती वेळा बाहेर जाऊन खेळतो त्या एवजी आपण त्यांना एखादा movie लाऊन कॉम्पुटर समोर बसवून ठेवतो... हे कदाचित आपणच बदलू शकतो....

      Delete